
फैजपूर (प्रतिनिधी) आज शहरात दशमाता स्थापने निमित्ताने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
दि 31 बुधवारी दुपारी 4 वाजता शहरातील राजबाग सानेगुरुजी नगरमध्ये पिंपरुड ग्रामपंचायत सदस्य किरण चौधरी यांच्या निवासस्थानी दशमातेची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. शहरात दरवर्षी दशमाता उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा उत्सवा निमित्ताने शहरातील श्रीराम मंदिरापासून जुने हायस्कुल, रथ गल्ली, होलेवाडा, लक्कड पेठ, मारुती मंदिर, सुभाष चौक मार्गे राजबाग पर्यंत मिरवणूक पार पडली. मिरवणुकीत दशमताचे वहन उंट सर्वांचे आकर्षण ठरले. तर नवदुर्गाचा सजीव देखाव देखील करण्यात आला होता. दरम्यान दि 31 रोजी दशमाता मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येणार असून उपस्थितींचे आवाहन आयोजक किरण प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.