संत नगरी शेगावात ऋषीपंचमी निमित्त भव्य सोहळा

शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत नगरी शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या ११४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने भक्तिमाय सोळा पार पडत आहे. त्या अनुषंगाने आज सकाळी श्री गणेशयाग व वरूनयागाची पूर्णहुती होणार आहे. तर दुपारी पालखी परिक्रमा होणार आहे.

श्रींच्या समाधी सोहळा निमित्त आज 8 सप्टेंबर रोजी सकाळी सात ते नऊ या वेळेत हरिभक्त परायण बाळूबुवा गिरगावकर आणि हरिभक्त परायण भरतबुवा पाटील यांचे कीर्तन झाले. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूनयागास चार सप्टेंबर पासूनच प्रारंभ झाला होता.

यागाची पूर्ण होती आज रविवार सकाळी दहा वाजता ब्रह्मवृद्धांच्या उपस्थितीत झाला असून दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची पूजन होऊन श्रींच्या पालखीचे रथ मेना पताका टाळकरी आश्वासह परिक्रमांना आहे .सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांची आकर्षक रिंगण सोहळा होणार आहे . भक्तांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यासाठी तत्पर आहे.
आहे . या उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधा संस्थांच्या वतीने पुरविला जात आहे. श्रींच्या दर्शनासाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे त्यात दर्शन बारी व श्रीमुख दर्शन बारी महाप्रसाद पारायण मंडप श्रींची गादी पलंग व औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे.

Protected Content