पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोऱ्यात संत निरंकारी सत्संग भवनात भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन आणि संत निरंकारी पाचोरा ब्रॅन्चच्या वतीने झोनल इन्चार्ज हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. रक्तदान शिबीराचे उद्घाटन हिरालाल पाटील, पाचोरा ब्रॅन्चचे संयोजक महेश वाघ, किशनचंद वरलाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबीरात परिसरातील असंख्य रक्तदात्यांनी “रक्त नाडियों बहें, नालीयों में नहीं” या घोषवाक्याने प्रभावीत होवुन रक्तदान केले.
संत निरंकारी फाऊंडेशन, दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात सन – १९८१ पासुन विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे पाचोरा शहरातील वरखेडी रोडवरील संत निरंकारी सत्संग भवन, पाचोरा येथे १० मार्च रोजी सकाळी ८ वाजेपासून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली, पाचोरा संत निरंकारी फाऊंडेशन (धुळे झोन ३६ बी) तर्फे भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या रक्तदान शिबीरात परिसरातील असंख्य रक्तदात्यांनी “रक्त नाडियों बहे, नालीयों में नहीं” या घोषवाक्याला प्रभावीत होवुन रक्तदान केले. सदरचे रक्तदान शिबीरात जळगांव येथील रक्तकेंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. शामली नावाडे, डॉ. भावेश खडके, डॉ. प्रिया ठाकुर व त्यांच्या पथकाने रक्तदात्यांचे यशस्वी रक्तदान करुन घेतले.
रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादलाचे अधिकारी नितीन वरलाणी, गोकुळ परदेशी यांच्यासह सेवादलाचे पुरुष, महिला, तरुण, तरुणी सदस्यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित रक्तदात्यांसाठी व उपस्थितांसाठी सकाळी अल्पोपहार, चहा, काॅफी व दुपारी भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली होती.