Home Cities अमळनेर बसस्थानक आवारातून वृध्द महिलेची ६० हजारांची सोन्याची बांगडी लांबविली

बसस्थानक आवारातून वृध्द महिलेची ६० हजारांची सोन्याची बांगडी लांबविली


अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर बसस्थानक आवारातून महिलेल्या हातातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरून नेल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमिलाबाई रामलाल कुमावत वय ६३ रा.एरंडोल या वृध्द महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता त्या अमळनेर बसस्थानक येथे बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतील २० ग्रॅम वजनाची ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना वृध्द महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सोमवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound