कलाकृतीतून सशक्त महिलांचे दर्शन; कलाशिक्षकाच्या उपक्रमाचे कौतुक

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त एक अनोखी कला सादर करत स्त्रीशक्तीला सलाम केला आहे.

महिला दिनाचे औचित्य साधून कुलकर्णी यांनी शाळेच्या दर्शनी फलकावर एक विशेष सामाजिक संदेशपर रेखाटन साकारले. त्यांच्या कलाकृतीतून महिला आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळून कौटुंबिक तसेच व्यावसायिक जीवनात यश संपादन करत असतात, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे. स्त्री ही प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडते, ती कधीही कोणाकडे तक्रार करत नाही, तर जीवनातील प्रत्येक भूमिकेत यशस्वी ठरते, हा संदेश या चित्रातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

या अनोख्या उपक्रमामुळे निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद प्रभावित झाले असून, या सामाजिक संदेशपर रेखाटनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कलाशिक्षक कुलकर्णी यांच्या या प्रयत्नातून समाजातील प्रत्येक घटकाने महिलांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन द्यावे, असा सकारात्मक संदेश दिला आहे.

Protected Content