लग्नात स्मोक पान खाल्ल्याने मुलीच्या पोटाला पडले छिद्र; सर्जरी करून मोठा भाग कापवा लागला

बंगळूरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बेंगळुरूमध्ये एका लग्नात एका १२ वर्षाच्या मुलीने सुपारीचे ‘स्मोक पान’ खाल्ले. या प्रकारच्या पानामध्ये द्रव नायट्रोजनचा वापर केला जातो. पान खाल्ल्यानंतर मुलीच्या पोटात अचानक दुखू लागले. काही वेळातच मुलगी वेदनेने तडफडू लागली. मुलीची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले. हे पान खाल्यामुळे तिच्या पोटात छिद्र पडले. हे प्रकरण इतके गंभीर झाले की, इंट्राऑपरेटिव्हद्वारे डॉक्टरांना मुलीच्या पोटात द्रव नायट्रोजन जास्त प्रमाणात असल्याने तिच्या पोटात छिद्र पडल्याचे दिसले.

नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले की, मुलीची ढासळलेली प्रकृती पाहून तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या मुलगी धोक्याबाहेर आहे आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु ऑपरेशन दरम्यान, डॉक्टरांना आढळले की द्रव नायट्रोजनमुळे, तिच्या पोटात ४.५ सेमीचे मोठे छिद्र तयार झाले आहे. त्यामुळे तिच्या पोटाचा काही भाग कापावा लागला.डॉक्टरांच्या मते, लिक्विड नायट्रोजन पोटात गेल्यास शरीराला मोठी हानी होते. त्यांनी सांगितले की नायट्रोजनचे द्रव प्रमाण शरीरात गेल्यास धोकादायक परिणाम होऊ शकतात.

Protected Content