Home क्राईम मध्यरात्री भुसावळात चोरट्यांचा डल्ला : दागिन्यांसह रोकड लंपास !

मध्यरात्री भुसावळात चोरट्यांचा डल्ला : दागिन्यांसह रोकड लंपास !


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, आता भरवस्तीत घरफोडी झाल्याची घटना समोर आली आहे. सिध्दिविनायक नगर, सायाली लॉन्सच्या मागे असलेल्या रहिवासी भागात अज्ञात चोरट्यांनी एका घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील सिध्दीविनायक नगरात पुनीत रामलालजी वर्मा (वय ४०) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. रविवारी १९ मार्च रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी पुनीत वर्मा यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा शिताफीने तोडून घरात प्रवेश मिळवला. चोरट्यांनी घरातून ७० हजारांची सोन्याचे मनी, दीड हजारांचे चांदीचे नाणी, आणि ३ हजारांची रोकड असा एकुण ७४ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी पुनीत वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


Protected Content

Play sound