Home क्राईम यावलजवळ दुचाकीला चारचाकीची जोरदार धडक – जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

यावलजवळ दुचाकीला चारचाकीची जोरदार धडक – जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अंकलेश्वर–बुरहानपूर राज्य महामार्गावरील वन विभागाच्या नाक्याजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावल पोलिसांनी संबंधित चारचाकी वाहन ताब्यात घेतले असून, अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कासारखेडा येथील रहिवासी रसूल रहिमान तडवी, आलिशान रहिमान तडवी आणि सलीमा रहीम तडवी हे तिघे दुचाकी (क्रमांक एम.एच. 19 डी.वाय. 9047) वरून यावलहून चोपड्याकडे जात होते. दरम्यान, वन विभागाच्या नाक्याजवळ अचानक आलेल्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एम.पी. 09 डब्ल्यू.एल. 3915) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतरावर फेकली गेली आणि तिघेही रस्त्यावर कोसळले.

अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ तिन्ही जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या आलिशान रहिमान तडवी या महिलेला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले. इतर दोन जखमींवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

या अपघाताबाबत रसूल रहिमान तडवी यांनी यावल पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी चारचाकी वाहन ताब्यात घेतले असून, अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पासपोळे करीत आहेत.

या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी महामार्गावरील वेगमर्यादा आणि सुरक्षित वाहनचालकतेबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound