Home क्राईम वळणावर ट्रकवर आदळली चारचाकी वाहन; गुन्हा दाखल

वळणावर ट्रकवर आदळली चारचाकी वाहन; गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील महामार्गावरून जात असताना अचानक वळण घेतलेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या चारचारी वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.  या प्रकरणी दोन्ही वाहनांच्या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या ट्रकचे  (क्र. एमएच ४०, बीएल ६५८७) चालक सुनीलकुमार रमेशचंद्र चव्हाण (रा. नागपूर) यांनी अचानक वळण घेतले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या चारकाकी वाहनाची (क्र. एमएच १९, एएक्स ०३५१) या ट्रकच्या मागील बाजूला धडक लागली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी पोकॉ किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असल्याने ट्रक चालक सुनीलकुमार चव्हाण व चारचाकी चालक शेख साजीद शेख जब्बार (रा. चोपडा) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात २८ ऑगस्ट रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार करीत आहेत.


Protected Content

Play sound