Home क्राईम कोल्हे नगरात बंद घर फोडून ४० हजारांचा ऐवज लांबविला !

कोल्हे नगरात बंद घर फोडून ४० हजारांचा ऐवज लांबविला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोल्हे नगर भागात एका सेवानिवृत्त व्यक्तीचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शनिवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुरलीधर नारायण धांडे (वय ७५, जळगाव) हे आपल्या घरी नसताना ही घटना घडली. २६ डिसेंबर २०२५ च्या रात्री १० वाजेपासून ते २८ फेब्रुवारी २०२६ च्या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. धांडे यांचे घर बंद असल्याचे पाहून अज्ञात आरोपींनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील कपाटाचेही कुलूप तोडून त्यातील एकूण ४० हजार ४०० रुपये किमतीच्या चांदी आणि पितळी वस्तू चोरून नेल्या. २८ फेब्रुवारी रोजी जेव्हा ही चोरीची घटना लक्षात आली, तेव्हा धांडे यांनी तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल शरद वंजारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound