विनापरवाना शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याला २१ हजारांचा दंड

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेतकऱ्यांच्या हितासाठी अॅक्शन मोड पर आले असुन परवाना नसतांना शेतीमाल खरेदी करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्यांमध्ये ‘भिती निर्माण झाली आहे.

यावल तालुक्यातील दहिगाव येथे विनापरवाना मका खरेदी करतांना सावदा येथील एक व्यापारी मिळून आल्याने तसेच त्या व्यापाऱ्याची संपुर्ण चौकशी केल्यावर संबधीत व्यापारी व मक्याने भरलेली यावल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आणून व्यापाऱ्याला सभापती यांनी २१ हजार रुपये दंड वसुल केला आहे. यामुळे यावल तालुक्यात बोगस व्यापाऱ्यांना मोठी चपराक बसली असून विनापरवाना धान्य खरेदी केल्यास अशाच प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांच्याकडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्यांकडून फसवणूक होते, या दृष्टिकोनातून सभापती राकेश फेगडेसह संचालक मंडळ आणि येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कारवाईचे धोरण अवलंबले असून जो कोणी विनापरवाना शेतकऱ्यांचा माल खरेदी करेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या आधीच बाजार समितीने गावोगावी रिक्षा फिरवून लाऊड स्पीकर मधून जाहीर केलेले आहे. तसेच गावातील विकास सोसायटी आणि ग्रामपंचायतमध्ये संचालक मंडळाच्या आदेशावरून नोटीस चिटकवण्यात आली आहे.

याच धर्तीवर दहिगाव येथील चार ते पाच शेतकऱ्यांचा मका सावदा येथील व्यापारी शेख रईस शेख सलीम कुरेशी यांनी चढ्या भावाने मका खरेदी केला असे स्पष्ट झाले सदर संबंधित शेतकऱ्यांची सभापती राकेश फेगडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांनी संपर्क साधून आपल्या मक्याचे पैसे संबंधित व्यापाऱ्याने नगदी पैसे दिलेत का असे विचारणा केली असतात त्यांना पैसा मिळाल्याचे सांगण्यात आले मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची फी व विनापरवाना भुसार धान्य खरेदी करणे यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचाऱ्यांनी सदरची गाडी दहिगाव वरून कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे आणून लावली व संबंधित व्यापाऱ्याला सावदा येथून बोलावून बाजार समितीचे सर्व नियम कसे आहेत हे सांगितले त्यानुसार झालेली चूक लक्षात येताच व्यापारी रईस शेख सलीम कुरेशी यांच्याकडून २१ हजार रुपये दंड वसुल करण्यात आले आहे. मक्याने भरलेली ट्रक वाहन क्रमांक (एमएच ४६ एएफ ५५५४) हा संबंधित व्यापाऱ्याच्या ताब्यात दिला या वरील या वाहनावरील वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या मजुरांचा जबाब नोंदवून घेण्यात आले आहे.

सदरच्या या दंडात्मक कारवाईमुळे तालुक्यात विनापरवाना अनधिकृतपणे शेतकरी बांधवांकडून शेतीमालाची खरेदी करणाऱ्या तथाकथित व्यापाऱ्यामध्ये चांगलेच भितीचे वातावरण पसरले आहे . यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी हितासाठी सभापती व त्यांच्या संचालक मंडळाने घेतलेला या निर्णय व केलेली कारवाईचे शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Protected Content