भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल
भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गडकरी नगरात काही कारण नसताना एका अल्पवयीन मुलाला फायटरने नाकावर तोंडावर मारहाण करून जखमी केल्याची घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली होती. त्याच्यावर उपचार केल्यानंतर अखेर गुरुवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अक्षय प्रदीप साबळे (वय-१७) रा. लाइफस्टाईल कॉलनी, भुसावळ हा मुलगा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता काही कारण नसताना संशयित आरोपी शौर्य शिवमोहन सिंग आणि अली फिरोज खान दोन्ही रा. जाम मोहल्ला, भुसावळ यांनी फायटरने नाकावर तोंडावर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि दोघे फरार झाले. दरम्यान जखमी अवस्थेत असलेल्या अक्षय साबळे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर अखेर गुरुवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार संशयित आरोपी शौर्य शिवमोहन सिंग आणि अली फिरोज खान या दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करीत आहे.