Home धर्म-समाज श्री संत शिरोमणी गुरु रविदास जयंतीनिमित्त सत्कार समारंभ

श्री संत शिरोमणी गुरु रविदास जयंतीनिमित्त सत्कार समारंभ


दीपनगर ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राधाकृष्ण श्री संत शिरोमणी गुरु रविदास सेवा ट्रस्टच्या माध्यमातून 12 फेब्रुवारी 2025 रोजी काहूरखेडा तालुका भुसावळ येथे संजय सावकारे (वस्त्र उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री भंडारा) आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाप्रसंगी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र बाविस्कर व केंद्रीय मानव अधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. संजयजी भटकर सर यांचे मार्गदर्शन लाभणार असून मुख्याध्यापक सुरेश अहिरे, मा. मुख्याध्यापक सुनील भिरूड, सामाजिक कार्यकर्ते विकास दांडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर ठिकाणी संध्याकाळी 8.00 वाजता ह.भ‌.प. पंकज महाराज मुक्ताईनगर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

सदर कार्यक्रमाला चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे बुद्धिस्ट फाउंडेशनचे कार्याध्यक्ष नरेंद्र रहाटे, सरकारी कंत्राटदार धनंजय काळे, सरकारी कंत्राटदार मलकित सिंग गोहत्रा, सबऑर्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे सचिव निर्मिती समन्वयक आशुतोष लांबोळे, आंबेडकरी वाईस मीडिया फोरम भुसावळ तालुक्याचे अध्यक्ष मा. चंद्रशेखर निकम, उपमुख्य अग्निशमन अधिकारी मा.राजेश शिंदे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी मनोहर पाटील, लक्ष्मण जोगी आणि सुकलाम सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. सदर कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान राधाकृष्ण संत शिरोमणी गुरु रविदास सेवा ट्रस्ट काहूरखेडा तालुका भुसावळ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

 


Protected Content

Play sound