बैलगाडीचा धक्का लागल्यावरून शेतकरी कुटुंबाला मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शवारातील तळेगाव शिवारातील शेतात बैलगाडीला दुसऱ्या बैलगाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यासह त्यांची पत्नी व मुलगी यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केल्याची घटना १२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी १६ जून रोजी दुपारी सव्वा चार वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथे सुधीर यावल मांडे वय ४६ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. १२ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता बैलगाडीने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी तळेगाव शिवारातील शेताजवळ त्यांच्या बैलगाडीचा धक्का दुसऱ्या बैलगाडीला लागला. याचा राग आल्याने रविंद्र यादव मांडे, हर्शद रविंद्र मांडे, सुनिता रविंद्र मांडे, निकिता रविंद्र मांडे आणि आश्विनी रविंद्र मांडे सर्व रा. तळेगाव ता. चाळीसगाव यांनी सुधी मांडी यांच्यासह त्यांची पत्नी शारदाबाई मांडे आणि मुलगी शितल मांडे या तिघांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. याप्रकरणी रविवारी १६ जून रोजी दुपारी ४ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे रविंद्र यादव मांडे, हर्शद रविंद्र मांडे, सुनिता रविंद्र मांडे, निकिता रविंद्र मांडे आणि आश्विनी रविंद्र मांडे सर्व रा. तळेगाव ता. चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विकास चव्हाण हे करीत आहे.

Protected Content