कारच्या धडकेत दुचाकीवरील शेतकऱ्याचा मृत्यू

पहूर ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतातील काम करून मोटरसायकलने घराकडे येत असताना गणेश नर्सरी जवळ जळगाव छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर दुचाकीला कारने दिलेल्या धडकेत ज्ञानेश्वर उर्फ बाळू रामकृष्ण तरवडे (रा.पहूर पेठ वय 43) हे गंभीर जखमी झाल्याने संध्याकाळी त्यांना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांना मृत घोषित केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्वर रामकृष्ण तरवडे हे दुचाकीवरून शेतात काम करण्यासाठी गेले होते शेतातील काम झाल्यानंतर संध्याकाळी घरी परत येत असताना जळगाव छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर गणेश नर्सरी जवळ रस्ता ओलांडात असताना (एम एच 19 ई जी 4701) या इको कारणे मागून धडक दिल्याने यात ज्ञानेश्वर तरवाडे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी पहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी देवेंद्र घोंगडे, संदीप घोंगडे यांच्यासह पहूर पेठ चे सरपंच अफजल तडवी, सलीम शेख गाणी यांनी घटनास्थळी पोचून तातडीने मदत कार्य केले. अपघातग्रस्त वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी तपासणी केल्यानंतर ज्ञानेश्वर तरवाडे यांना मृत घोषित केले. ईको वाहनाचे चालक इमरान अलीम पटेल (रा. नांदेड वय 31) तालुका धरणगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

 

Protected Content