Home क्राईम बैलाखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पोळ्याच्या पुर्वसंध्येला दुदैवी घटना

बैलाखाली दबल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; पोळ्याच्या पुर्वसंध्येला दुदैवी घटना

0
122


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोळा सणाच्या पुर्व संध्येला पोळा सणासाठी बैलांना सजविण्याची तयारी करत असतांना एका शेतकरी बैलाखाली दबल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. विठ्ठल देवचंद भडांगे वय ६२ रा. पहूर कसबे ता. जामनेर असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल भडांगे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. पोळा सणाच्या पुर्वसंध्येला बैलांच्या शिंगाना कलर लावत असतांना अचानक ते बैलाखाली दबले गेले, त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी नातेवाईकांनी एकच अक्रोश केला हेाता. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून पोळा सणावर दुःखाचे सावट पसरले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound