वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील घाटे कॉम्प्लेक्ससमोरून अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर चाळीसगाव शहर पोलीसांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता कारवाई केली आहे. याप्रकराणी शनिवारी ८ जून रोजी मध्यरात्री १ वाजता चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील घाटे कॉम्प्लेक्स परिसरातून शुक्रवारी ७ जून रोजी रात्री ११ वाजता डंपर क्रमांक (एमएच १२ इएफ ९४२३) मधून अवैधपणे वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने कारवाई करत वाळू वाहतूक करणारे डंपर अडविले. त्यावेळी डंपर चालक याला वाळू वाहतूकीचा परवाना विचारला. त्यावेळी चालक विठ्ठल नागराज कोळी वय-२४ रा. भोरखेडा ता. भडगाव याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी चालकाने वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी वाळूने भरलेला डंपर हा जप्त केला. दरम्यान याप्रकरणी पो.कॉ. निलेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक विठ्ठल कोळी यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश बेलदार हे करीत आहे.

Protected Content