जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शासकीय महाविद्यालय परिसरात एकाचा मृतदेह आढळला. या इसमाने २३ नोव्हेंबर रोजी याच रुग्णालयातून औषधी घेतलेल्या होत्या. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनील मधुकर गायकवाड (वय ५६, रा. जळगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी रविवारी २४ नोव्हेंबर रोजी सकाळपासून एक जण वाळूमध्ये डोके फसलेल्या अवस्थेत पडलेला दिसून आला. दुपारी ३ वाजता त्याला रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला मयत घोषित केले. या मयताच्या खिशात शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी काढलेला केस पेपर आढळला. त्यावरून त्याचे नाव समजू शकले.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोहेकॉ महेंद्र पाटील यांनी केले आहे.