अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जुन्या भांडणाच्या कारणावरून गोवर्धन गावात एका महिलेला तिच्या पतीसह शिवीगाळ करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना ४ जून रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार ७ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता मारवड पोलीस ठाण्यात ३ जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रत्नाबाई सुरेश पवार या महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहे. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून ४ जून रोजी रात्री ११ वाजता गावात राहणारे गोविंदा लक्ष्मण पवार, रमणबाई गोविंदा पवार आणि जयेश गोविंदा पवार सर्व रा. गोवर्धन ता. अमळनेर यांनी दोघांना शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवार ७ जून रोजी दुपारी ३.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात गाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे गोविंदा लक्ष्मण पवार, रमणबाई गोविंदा पवार आणि जयेश गोविंदा पवार या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास तपास पोहकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.