पहूर ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ‘व्हॅलेंटाईन डे’ दिनानिमित्त पहूर पोलिस ठाण्यात एका जोडप्याचे लग्न लावून दिले आहे. या बातमीने सर्व गावात चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पोलिस स्टेशन हद्दीतील वडाळी येथील नवरदेव असलेले आमीन गंभीर तडवी वय 21 वर्षे व ढालगाव येथील नवरी मुलगी इर्शाद जब्बार तडवी वय 21 वर्षे हे एकमेकांचे नातेवाईक असून गेल्या चार महिन्यापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तरीसुद्धा 10 फेब्रुवारी रोजी ते दोघेही कोणाला काही एक न सांगता अहमदाबाद येथे पळून गेले होते.
दोघांचाही नातेवाईकांनी शोध घेतला परंतु आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी दोघेही पहूर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक प्रताप पिंगळे यांचे समोर हजर झाले पहूर पोलिस स्टेशन येथे नव्याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दोघांच्या नातेवाईकांना पहूर पोलीस स्टेशनला बोलावून सदर माहिती दिली दोघांच्या नातेवाईकांनी तसेच नवरदेव व नवरी ने पोलीस स्टेशन मध्ये लग्न करण्याचा आग्रह धरल्याने पहूर पोलिस स्टेशनच्या आवारातील दत्त मंदिरात यांचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला.
यावेळी पहूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, सहायक फौजदार अनिल सुरवाडे, सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख, गोपाल माळी, संदीप पाटील ,राहुल जोहरे, विनोद पाटील, श्रीराम धुमाळ, सर्व पोलिस कर्मचारी सर्व पक्षीय प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी ,पत्रकार बांधव उपस्थित होते पोलीस स्टेशन येथे झालेल्या या विवाह मुळे खाकी वर्दीतील माणुसकी आजही जिवंत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.