जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी गावाजवळील चांडक हॉस्पिटलजवळ राहणाऱ्या एका तरूणाच्या घराच्या खिडकीतून आत प्रवेश करत सोन्याचे मंगलपोत, दोन मोबाईल आणि ३५ हजार रूपयांची रोकड असा एकुण ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील आदित्य गोल्ड सीटी खेडी शिवारात चांडक हॉस्पिटल जवळ कुंदन भटू सोनी वय ३१ रा. चांडक हॉस्पिटल, खेडी ता.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. एमआयडीसीतील चटई कंपनीत तो कामाला आहे. १४ ऑगस्ट रोजी तो कंपनीत कामाला निघून गेला होता. त्यावेळी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्याच्या घराक्ष्या खिडकीतून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे मंगलपोत, दोन मोबाईल आणि ३५ हजारांची रोकड असा एकुण ७५ हजार रूपये किंमतीच ऐवज चोरून नेला. हा प्रकार सकाळी साडेसात वाजता समोर आला. याप्रकरणी गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.