Home Cities जळगाव शिवकॉलनीत बंद घर फोडले; सव्वा लाखाचा मुद्देमाल लांबविला

शिवकॉलनीत बंद घर फोडले; सव्वा लाखाचा मुद्देमाल लांबविला


जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोन्याचे दागीने आणि रोकड असा एकुण १ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लता मधुकर महाजन रा. शिवकॉलनी हे २२ जून रोजी रात्री ८.३० वाजता मुलगा मयुर महाजन आणि मुलगी सोनम महाजन हे नातेवाईकांकडे पुण्याला गेले. दरम्यान, २२ जून रात्री ८.३० ते २४ जून दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील १ लाख ५ हजार रूपये किंमतीचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १५ हजाराची रोकड असा एकुण १ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. लता महाजन यांच्या लहान बहिणीचे पती मदन तुकाराम माळी यांनी  पोलीसांना कळविले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. दरम्यान मदन कोळी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पो.कॉ. उषा सोनवणे करीत आहे.  

 

 

 


Protected Content

Play sound