भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शिवशक्ती कॉलनीजवळील सोमनाथ नगरात वृद्धाचे बंद घराचे खिडकीचे गज कापून आत प्रवेश करत करातून सोन्याचे चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख २ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल हरी बऱ्हाटे वय-६४, रा. सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी भुसावळ असे वृध्द आपल्या पत्नीसह वास्तव्यासला आहेत. त्यांच्या पुतण्याचे हळदीचा कार्यक्रम असल्याने बऱ्हाटे दाम्पत्य हे सोमवारी २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता घरबंद करून कार्यक्रमात गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त करून घरातून सोन्याची पोत, कानतले दागिने, डोरले, अंगठ्या आणि ३ लाख ६० हजारांची रोकड असा एकुण ७ लाख २ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना रात्री १० वाजता उघडकीला आली आहे. दरम्यान या घटनेची माहिती अनिल बऱ्हाटे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी घटनांसाठी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान या प्रकरणी अनिल बऱ्हाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे करीत आहे.