भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गजानन मंदीर परिसरात राहणाऱ्या एका तरूणाचे बंद घर फोडून घरातील कपाटातून ३ लाख १८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी २९ जून रोजी दुपारी ४.३० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ३० जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नरेश घनश्यामदास रोहडा वय ३२ रा. गजानन महाराज मंदीरजवळ, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २९ जून रोजी सकाळी १० वाजता ते कामाच्या निमित्ताने घर बंद घरून घरातून निघून गेले. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातून लोखंडी कपाटातून ३ लाख १८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी २९ जून रोजी दुपारी ४.३० वाजता उघडकीला आले. याप्रकरणी रविवारी ३० जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एकनाथ पाटील हे करीत आहे.