भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचे बंद घर फोडले

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या घराचे कुलूप तोडून घरातून बाराशे रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना भुसावळ शहरातील कमल गणपती हॉलजवळ राहणाऱ्या मंगळवार २५ जून रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेमंत शिवाजी आभाळे वय ३२ रा. कमल गणपती हॉलजवळ, भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रेल्वेत नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १६ जून रोजी रात्री ११ वाजता हेमंत हा घराला कुलूप लावून कामावर निघून गेला होता. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून बाराशे रूपयांची रोकड चोरून नेली. मंगळवारी २५ जून रोजी हेमंत आभाळे हा तरूण घरी आला तेव्हा घरात चोरी झाल्याचे समोर आले. याप्रकरणी त्याने मंगळवारी रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदिप पालवे हे करीत आहे.

Protected Content