आसोदा शिवारात बंद घर फोडले, रोकडसह सोन्याचे दागीने लांबविले

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा शिवारातील कला वसंत नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सोन्याचे दागीने आणि रोकड असा एकुण ११ हजार २५० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे बुधवारी १५ डिसेंबर रोजी सकाळी निदर्शनास आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, विजय शांताराम पाटील (वय-३६) रा. कला वसंत नगर, आसोदा शिवार, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ११ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १५ डिसेंबर सकाळी १० वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. घराचा बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कूलूप तोडून घरातील ३ हजार ७५० रूपयांची रोकड आणि ७ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण ११ हजार २५० रूपयांचा मुद्देमालाची चोरी केल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी विजय पाटील यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि माणीक सपकाळे करीत आहे.

Protected Content