अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चिकन लवकर न दिल्याच्या रागातून चिकन विक्रेत्याला लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अमळनेर तालुक्यातील झाडी येथे घडली. याप्रकरणी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, फारूख अल्लाउद्दीन खाटीक वय ३९ रा. शिरसाळे ता. अमळनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अमळनेर तालुक्यातील झाडी येथे चिकन विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वैभव किरण पाटील रा. झाडी ता.अमळनेर हा चिकन घेण्यासाठी आला. त्यावेळी चिकन लवकर न दिल्याच्या रागातून चिकन विक्रेता फारूख खाटीक याला वैभव पाटील याने शिवीगाळ करत लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन निकम हे करीत आहे.