कोरोना महामारीत जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोरोना महामारीच्या भीषण काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनसामान्यांसाठी कार्य तत्पर राहून सेवा देणाऱ्या सर्व परितात्र्यांचा कृतज्ञता सन्मानाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी रावेर-यावल मतदार संघातील सर्व आशावर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शासकीय कर्मचारी तसेच परिसरातील सर्व डॉक्टरांचे सत्कार यावेळी करण्यात आला.जनतेतील सर्व परितात्र्यांचा यावेळी कृतज्ञता पूर्वक सन्मान केला गेला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शिरिष चौधरी,प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतधिकारी बबनराव काकडे, तहसीलदार संजय कापसे,रावेर बीडीओ दीपाली कोतवाल, यावल बीडीओ मंजुश्री गायकवाड यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे, युवानेते धनंजय चौधरी, डॉ.अरुणा चौधरी, योगिताताई वानखेडे, मानसी पवार, उल्हासशेठ चौधरी, लिलाधर विश्वनाथ चौधरी, शेखर पाटील, डॉ राजेंद्र पाटील,श्री किशोर पाटील, मुकेश येवले,सोपान पाटील, योगीराज पाटील, सोपान पाटील, प्रल्हाद बोडे, हरीश गणवाणी, संजू जमादार, सामजिक कार्यकर्ते जावेद जनाब जफर मेम्बर सुनील लक्ष्मण मोपारी,पांडुरंग पाटील, फिरके सर्फराज तडवी, देवेंद्र चोपडे, नदीम पिंजारी, सतीश पाटील, आत्माराम शंकोपाल, डॉ. सुरेश पाटील, अविनाश पाटील, शरद कोळी, कडू पाटील, संतोष खर्चे, नितीन महाजन, कदिर खान, रियाज मेम्बर, राजू सवरने, महेबूब पिंजारी, कलिंम खान, मण्यार डॉ. दानिश शेख, धुमा तायडे, सावन मेढे, शरीफ, रामराव मोरे, देवेंद्र बेंडाळे, अशोक भालेराव, अप्पा चौधरी, वसीम तडवी, डॉ गणेश चौधरी, रतन बारेला, असद सय्यद, युवराज कराड, विकास पाटील, प्रवीण सोनवणे, डॉ राजेंद्र झाम्बरे, डॉ. सुधाकर चौधरी, चतुर राणे, रौनक तडवी, पिंटू पवार, सलीम तडवी, अनिल जंजाळे, गणेश गुरव, जयेश चोपडे, वाय एस महाजन, छोटू तडवी, लियाकत जमादार, राहुल तायडे, मुस्तुफा तडवी, मुकेश पाटील, विनोद झालटे, सौद शेख व महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते नागरिकांची उपस्थिती होती.

अत्यंत भयावह स्थितीत आपल्या प्राणाची पर्वा न करीत जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटलेल्या या जनसेवकांचा हा सत्कार करण्यात आला.तसेच राज्य शासनाने त्वरित अंगणवाडी सेविका, आशावर्कर, मदतनीस यांना मानधन वेतन मधून रोजगाराच्या कक्षेत आणावे यासाठी आमदार शिरिष चौधरी हे शासनाकडे मागणी लावून धसरणार असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगण्यात आले.

Protected Content