Home Cities जळगाव जळगावात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न

जळगावात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान सोहळा संपन्न

0
45


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | युवा विकास फाउंडेशन व सरदार वल्लभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व सन्मान सोहळ्यास प्रमुख ‘अतिथी म्हणून डॉ. ए. जी. भंगाळे, प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, रामदास भंगाळे, डॉ. स्नेहल फेगडे, रो. सचिव रवींद्र वाणी, युवराज परदेशी, शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, ग. स. संचालक महेश पाटील, महेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात तुकाराम गोविंदा महाजन, युवराज परदेशी, बाळासाहेब पाटील, प्रभाकर चौधरी, सरस्वती पाटील, धनंजय तळेले, प्रकाश सुपे, इकबाल शेख चांद,  सेवाबाई पाटील, डी. सी. पाटील, मिलिंद निकम,  रमेश जावळे, प्रकाश वाणी, शशिकला अत्तरदे, फकीरा कुमावत आदी ज्येष्ठांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना ज्येष्ठांचे स्थान कोपऱ्यात नसून देव्हाऱ्यात आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने जीवनातील अनेक संकटाना समर्थपणे आपण सामोरे जाऊ शकतो आपले जीवन हे सुखकर आणि सुखमय होऊ शकते असे विचार मांडले.  यश्वितेसाठी विवेक महाजन सुनील रोटे, अमोल मोरे, शुभम निकम, नेमचंद येवले, विकी काळे, सचिन पाटील, हर्षल चौधरी, सचिन महाजन, योगेश अत्तरदे आदींनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound