जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी फाट्यानजीक दुचाकीला धडक दिल्यामुळे भानुदास गोपाल जाधव (रा. कानळदा) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी घडली होती. तरूणाच्या मृत्यू प्रकरणी धडक देणाऱ्या चारचाकी चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भानुदास जाधव हे १४ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या दुचाकीने (एमएच १९, डीझेड ७९६१) जळगावकडून चोपड्याकडे जात असताना खेडी फाट्याच्या अलीकडे समोरुन येणाऱ्या चारचाकी वाहनाने (एमएच ३९, जे ११४५) धडक दिली होती. त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन ते ठार झाले होते. अखेर याप्रकरणी मयताचे भाऊ देविदास जाधव यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता धडक देणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गुलाब माळी करीत आहेत.