जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानळदा, आसोदा आणि निमखेडी परिसर अश्या तीन ठिकाणी गावठी हातभट्टी तयार करतांना पोलीसांनी छापा टाकून तीन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा, आसोदा आणि निमखेडी परिसरात काही व्यक्ती गावठी बनावटीची दारू तयार करत असल्याची गोपनिय माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्ष नयन पाटील यांच्यासह पोलीस पथकाने आज शनिवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ४ वाजेच्या दरम्यान तिनही ठिकाणी छापा टाकला. यात संशयित आरोपी निलेश उर्फ भोला माधवराव पाटील रा. कानळदा ता. जळगाव यांच्या ताब्यातून १ हजार ८०० रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या, आसोदा येथील संशयित आरोपी संदीप तुळशीरा कोळी यांच्याकडून ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली तर निमखेडी येथील संशयित आरोपी दीपक राजाराम कोळी याच्याकडून १ हजार ८ रूपये किंमतीची २० लिटर दारू हस्तगत केली. या तीनही कारवाईत ३ हजार ९४८ रूपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.