‘त्या’ प्रौढाच्या मृत्यू प्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्त्यावरील वढोदा गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाच्या मृत्यूप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अशोक पद्माकर नेवे (वय-५२) रा. साकळी ता. यावल जि.जळगाव असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नेवे हे आपल्या कुटुंबियांसह साकळी येथे वास्तव्याला होतो. अशोक नेवे हे यावल येथून आपले काम आटोपून आपल्या (एमएच १९डी एक्स ५४८२) मोटर सायकलने साकळी गावी जात असतांना यावल चोपडा मार्गावरील वढोदे गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गुरूवार ७ जुलै रोजी सायंकाळी मयत अशोक नेवे यांचे भाऊ चंद्रकांत पद्माकर नेवे यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे.

Protected Content