जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बंदी असतानाही सोशल मीडियावर चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारीत करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात १९ जानेवारी रोजी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाईल्ड पोर्नोग्राफीला बंदी असताना यु ट्यूब व इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या इन्स्टाग्राम खातेधारकांनी त्यांच्या या खात्याद्वारे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ प्रसारीत केले. हा प्रकार १५ जानेवारी २०२१ ते १० मे २०२१ दरम्यान घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे पोकॉ दीपक सोनवणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चाईल्ड पोर्नोग्राफी प्रसारीत करणाऱ्या नऊ जणांविरुद्ध शुक्रवार, १९ जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील करत आहेत.