अनंत-राधिका यांच्या विवाहसोहळयात घुसखोरी केल्यामुळे दोन जणांवर गुन्हा दाखल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत काल जगातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत आणि राधिका मर्चंन्ट यांचा शाही विवाह पार पडला. या विवाहसोहळ्या अनेक दिग्गजांनी व चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री, उद्योगपती, राजकीय व्यक्ती आदींना निमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या लग्नाला उपस्थिती लावली. मात्र, या शाही विवाहसोहळ्याच्या निमंत्रितांच्या यादीत नाव नसतांना देखील आंध्रप्रदेश येथील एक व्यापारी आणि एका यूट्यूबरने घुसखोरी केली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुकमान मोहम्मद शफी शेख आणि व्यंकटेश नरसैया अलुरी अशी या दोघांची नावे आहेत. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये उद्योजक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही लग्नसोहळा शनिवारी पार पडला. या ठिकाणी विशेष अतिथी यांच्या प्रवेशासाठी उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून या दोघांनी लग्नसोहळ्यात जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सांगितले की या दोघांना कार्यक्रमस्थळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले व त्यांना नोटीस बजावल्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुकमान मोहम्मद शफी शेख (वय २८) आणि व्यंकटेश नरसैया अलुरी (वय २६) अशी या दोघांची नावे आहेत आणि त्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले.

शेख हा व्यवसायाने व्यापारी आहे तर अलुरी हा आंध्र प्रदेशचा यूट्यूबर आहे. “दोन्ही आरोपींनी दावा केला की ते हा लग्न सोहळा पाहण्यासाठी आले होते. अलुरी, जो यूट्यूबर आहे, त्याने लग्न रेकॉर्ड करून तो त्याच्या चॅनेलवर दाखवणार होता. या दोघांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही शुक्रवारी सकाळी १०.४० वाजता, सुरक्षा रक्षक आकाश येवस्कर आणि त्याच्या सहकाऱ्याला केंद्राच्या पॅव्हेलियन १ जवळ फिरताना दिसले. दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याची चौकशी केली. दोघांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. अलुरीने स्वतःला यूट्यूबर असल्याचे सांगितले. तो आंध्र प्रदेशचा असल्याचे सांगितले. अलुरीने चुकीच्या पद्धतीने कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. गेट क्रमांक २३ मधून त्याने बेकायदेशीरपणे कोणतेही आमंत्रण नसताना आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याला आत जाऊ दिले नाही. नंतर तो कसा तरी गेट क्रमांक १९ मधून घुसण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी सांगितले की, अलुरीला निघून जाण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु तो तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याने त्याला पोलिस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले. शनिवारी पहाटे २.४० च्या सुमारास शेखला जिओ वर्ल्ड सेंटरच्या पहिल्या मजल्यावर नियमित तपासणीदरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडले. एका सुरक्षा रक्षकाला तो संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळले, त्यानंतर त्यांनी त्याला आमंत्रण आहे की नाही ते तपासले. मात्र त्याच्याकडे ते नसल्यामुळे त्याला सुरक्षा व्यवस्थापकाच्या ताब्यात देण्यात आले. यात त्याने तो पालघरचा असल्याचे सांगितले. त्याने गेट क्रमांक १० मधून बेकायदेशीरपणे प्रवेश केला. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याला लग्नसोहळ्यातून बाहेर जाण्यास सांगितले होते. मात्र, त्याने पोलिसांच्या सूचनांचे पालन केले नाही व तो सोहळ्यात फिरत राहिला. यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बीकेसी पोलिसांच्या ताब्यात दिले, दोघांवर चुकीच्या पद्धतीने आणि आमंत्रण नसतांना लग्नात प्रवेश केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Protected Content