वनरक्षकास धमकविल्याने दोघांवर गुन्हा दाखल

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | अवैध वृक्षतोड करण्याच्या इराद्याने आलेल्या व्यक्तींकडून मागूनही न दिल्याने वनरक्षकाने त्यांची कुऱ्हाड हिसकावून घेतली. यावर त्यांनी वनरक्षकास धमकविल्याने त्यांच्यावर गुन्हा रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, “वनरक्षक लेदा सिताराम पावरा (वय ३१ वर्ष) यांची वन परीक्षेत्र अधिकारी  प्रादेशिक कार्यालय, रावेर येथे नेमणूक असून आरोपी ऐशराम बलसिंग पावरा आणि दशरथ शिकाऱ्या पावरा दोघे रा . गारबर्डी, ता रावेर हे शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सहस्त्रलिंग बिट हददीत राखीव वनात अवैधरित्या प्रवेश करून अवैध वृक्षतोड करण्याच्या उद्देशाने आले होते.

वनरक्षक लेदा सिताराम पावरा यांनी त्यांना हटकत त्याच्याजवळ असलेली कु-कुऱ्हाड मागीतली असता त्यांनी कुऱ्हाड दिली नाही. वनरक्षक लेदा पावरा यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाड घेत असतांना ऐशराम पावरा आणि दशरथ पावरा यांनी वनरक्षकास धक्काबुक्की केली मात्र वनरक्षक लेदा पावरा यांनी कुऱ्हाड सोडली नाही. यावर दशरथ पावरा यांनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास  सुमारास त्यांच्या फोनकरुन “तू आमची कुऱ्हाड का घेतली ? तुला पाहून घेईन, हे तुला महागात पडेल, आम्ही तुझ्या घरी येतो कुऱ्हाड घ्यायला, नाहीतर तू सांग कुठे भेटायचे सांग आम्ही येतो तिथे येतो.” अशा प्रकारे फोनवर धमकी दिली.

यावरून वनरक्षक लेदा सिताराम पावरा यांच्या फिर्यादीवरून आज रविवार, दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ऐशराम बलसिंग पावरा व दशरथ शिकाऱ्या पावरा यांच्याविरुद्ध रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content