जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात कालिंका माता चौकात बुधवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भरदार डंपरच्या अपघातात मुलाचा मृत्यू झाला होता. यावेळी उपस्थित शंभर ते दीडशे अनोळखी व्यक्तींनी गैरकायद्यानुसार महामार्गावर वाहतूक बंद करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुरुवारी २६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनोळखी शंभर ते दीडशे व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील कालिंका माता चौकामध्ये चालक शुभम विश्वनाथ भोलाणे याने बुधवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता भरदार डंपर चालवून योजस धीरज बऱ्हाटे याचे चिमुकलेला चिरडले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी जमा करून परिसरामध्ये आरडाओरड करत पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. यावेळी काही जमावतील तरुणांनी मोठ-मोठ्याने आरडाओरड करत पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या शासकीय बंदोबस्तात अडथळा निर्माण केला आहे. तसेच काही जणांनी उभ्या डंपरला आग लावून पेटवून दिला होता. त्यामुळे शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जखमी झालेले पोलीस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी २५ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता जमावातील शंभर ते दीडशे अनोळखी व्यक्तींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ हे करीत आहे.