पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंपळगाव तांडा येथील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव तांडा येथे २६ वष्ज्ञिीय्र महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १९ जून रोजी रात्री एक वाजता सुमारास महिला ही घरात झोपलेली असताना तेथे राहणारा संशयित आरोपी परशुराम मधुकर पवार हा महिलेजवळ येवून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
याबाबत महिलेने पिंपळगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी परशुराम मधुकर पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पांडुरंग गोरबंजार करीत आहे.