सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सावदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे वाघोदा बु. (ता. रावेर, जि. जळगाव) येथे छापा टाकून गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई केली आहे.
सपोनि विशाल पाटील, सावदा पोलीस स्टेशन यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोहेकॉ 1602 विनोद पाटील, पोहेकॉ 530 किरण पाटील, पोकॉ 2521 बबन तडवी, पोकॉ 3287 मनोज तडवी, चापोकॉ 536 नामदेव कापडे, पोहेकॉ 2472 संजीव चौधरी यांचा समावेश होता. छाप्याच्या वेळी आरोपी शेख नईम शेख अयुब कुरेशी (वय 47, रा. रसलपुर, ता. रावेर) हा गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुमारे 60 किलो मांस (किंमत रु. 12,000/-), एक वजन काटा, मांस कापण्यासाठीचा सुरा व रोख रक्कम जप्त केली.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 60/2025 नुसार महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5(ब)(क), 9, 9(अ), तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 325, 271, 3(5) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 105 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ 1602 विनोद पाटील करीत आहेत.
सदर प्रकरणी सपोनि विशाल पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे की, ज्या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांचे मांस विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस ठाण्यास कळवावी. माहिती देणाऱ्यांचे नावे गोपनीय ठेवण्यात येतील आणि त्वरित कायदेशीर कारवाई केली जाईल.