जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील जोशी वाडा परिसरात लहान मुलांमध्ये वाद होवून दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोकॉ गणेश ठाकरे, छगन तायडे, किरण पाटील हे मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ईच्छादेवी चौकी येथे कर्तव्यावर हजर होते. दरम्यान, शहरातील मेहरुण परिसरातील जोशीवाडा परिसरात दोन गटातील लहान मुलांच्या भांडणावरुन तुफान हाणामारी होवून दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी त्यांच्यात मध्यस्ती करीत वाद मिटवले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी इम्रान रहीम बेग या पोलीस कर्मचाऱ्याने तक्रार दिली.
हाणामारी करुन दगडफेक करणाऱ्या गोपाल भगवान कोळी (वय ४१), ज्योती गोपाल कोळी (वय ३८), उज्वला भगवान कोळी (वय ५५), महेंद्र कोळी (वय ३४) तर दुसऱ्या गटातील शोएब शेख (वय २२), अशपाक शेख (वय २३), अलताफ शेख (वय २४), जुबेर शेख (वय २४), हकीम शेख (वय २०), चपटा (तय्याची बहिण) (वय २८), सलमा किराणावाली (वय ४०, रा. जोशीवाडा, मेहरुण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.