धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवडील खुबचंद सागरमल पेट्रोल पंपाजवळ दुर्गंधीयुक्त वास येत असलेल्या जनावरांचे चांमडे व हाडे यांची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकासह क्लिनरवर धरणगाव पोलीस ठाण्यात शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगावमार्गे ट्रक क्रमांक (युपी ९३ एटी ८१३५) जात असताना बांभोरी गावातील खुबचंद सागरमल पेट्रोलपंप येथे मधून दुर्गंधीयुक्त वास येत असलेल्या जनावरांचे चामडे, हाडे व इतर अवयव भरून नेत असताना बांभोरी गावातील काही तरुणांच्या लक्षात आले. याप्रकरणी प्रमोद युवराज कोळी (वय-३२) रा. पत्रकार कॉलनी बांभोरी ता. धरणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालक सल्लू खान बाबू खान व सोबत असलेला क्लीनर मानसिंग श्रीराम कुशवाह दोन्ही रा. राम चबुतरा ता. कालपी जिल्हा जालन उत्तर प्रदेश या दोघांवर शुक्रवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन महाजन करीत आहे.