भुसावळ लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शिवदत्त नगरात राहणाऱ्या वृद्ध महिलेला नगरपालिकेसमोरील पथदिव्यातील विद्यतू तारेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ७ ऑक्टोबर २०२२ मध्ये घडली होती. चौकशींती न्यायालयाचे आदेशानुसार बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता वृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या इलेक्ट्रिक दक्ष कर्मचाऱ्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, वत्सलाबाई शिवा हतागडे (वय-६०) रा.नहाटा कॉलेज जवळ भुसावळ या महिला आपल्या पतीचा वास्तव्याला होत्या. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता भुसावळ नगरपालिका दवाखान्याच्या वडील कचराकुंडीजवळ लोंबकळत असलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान सुरुवातीला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या संदर्भात त्यांचे पती शिवा धर्मा हतागडे यांनी न्यायालयात १० घेऊन जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली होती, त्यानुसार त्यांनी अर्ज देखील केला होता. चौकशी अंती नगरपालिका भुसावळ यांनी पथदिव्याची देखभाल व दुरुस्तीचे संपूर्ण काम पाहण्यासाठी E E S L कंपनीसोबत करार केला होता. करारनामा नुसार संपूर्ण जबाबदारी दक्ष इलेक्ट्रिकल्स महेंद्रसिंग यादव यांच्यावर होती. त्यानुसार बेजबाबदारपणामुळेच वृद्ध महिलेला इलेक्ट्रिक शॉक लागला हे निष्पन्न झाले. त्यानुसार मयत वृद्ध महिलेचे पती शिवा हताकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दक्ष इलेक्ट्रिकल्स महेंद्रसिंग यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अब्दुल सत्तार शेख करीत आहे.