
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील जुनी नगर परिषद परिसरातून एका भाजीपाला विक्रेत्याची मालवाहू पिकअप वाहनाची चोरी झाल्याची घटना मंगळवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याबाबत बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विनोद दत्तात्रय चौधरी वय ४४ रा. नशिराबाद जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून भाजीपाला विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. भाजीपाला मार्केटमधून ने आण करण्यासाठी त्यांच्याकडे मालवाहू पिकअप वाहन क्रमांक एमएच १९ बीएम ५६२२ आहे. २ डिसेंबर रोजी त्यांनी त्यांचे वाहन हे जुने नगर पंचायत परिसरात पार्कींगला लावलेली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हे वाहन चोरून नेले. हा प्रकार सायंकाळी ७ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी त्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कमालकर बागुल हे करीत आहे.



