Home Cities अमळनेर अमळनेरातून व्यावसायिकाची दुचाकी लांबविली

अमळनेरातून व्यावसायिकाची दुचाकी लांबविली

0
26

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  अमळनेर शहरातील न्यू प्लॉट परिसरातून एकाची २० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.  याबाबत शनिवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, गुलाब कोटुमल फतवाणी (वय-५०) रा. न्यू प्लॉट कॉलनी, अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे, १६ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वयाच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर दुचाकी (एमएच 19 बीएफ 2952) ही पार्किंगला लावलेली होती. आज्ञात चोरट्यांनी ही २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी परिसरात दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, परंतू दुचाकी कुठेही मिळून न आल्याने अखेर शनिवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.


Protected Content

Play sound