जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील नवीन बी.जे.मार्केट येथे ग्राहक बोलविण्याच्या कारणावरून एका व्यावसायिकाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, खुलाश तिलकराज शर्मा (वय-३१, रा. सिंधी कॉलनी,जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दुचाकी स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. खुलाश शर्मा यांचे न्यू बी.जे. मार्केट परिसरात दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. त्यांच्या दुकानाजवळच नजीमशेख अजीज (वय-३७, रा. सुप्रिम कॉलनी) हा दुचाकीचे काम करतो. शनिवारी २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता माझे ग्राहक तुझ्याकडे का बोलवतो, या रागातून खुशाल शर्मा यांना नजीमशेख अजीज याने शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सलीम तडवी हे करीत आहे.