Home Cities अमळनेर दहीवद येथे वीज पडून बैल ठार

दहीवद येथे वीज पडून बैल ठार

0
30

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद येथे वीज पडून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.६) रोजी पोळ्याच्या दिवशी घडली आहे.

येथील रहिवासी आबा हरी माळी यांच्या मालकीचा बैल आज  पोळ्याच्या सण असल्याने त्यांनी सकाळी चारा वैगेरे खाऊ घालून दुपारी आपल्या घरी बैल पोळा असल्याने पूजनासाठी आणला. यानंतर त्यांनी दहीवद टाकरखेड़ा रस्त्यावर असलेल्या शेतात निबाच्या झाडाला दोन्ही बैल बांधले आणि चारा टाकला मात्र, सायंकाळी पाच वाजता झालेल्या पावसाने जोरात विज कडाडली यात एक बैल थोड्या अंतरावर होता.   यात एका बैलावर विज पडल्याने तो जागीच ठार झाला. घटनास्थली पशुवैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील ,तलाठी एस.बी.पंचभाई कोतवाल प्रदीप देसले यांनी जावुन पंचनामा केला. पोळ‌्याच्या दिवशी शेतकरी राजावर आसमानी संकट कोसळल्याने संपूर्ण कुटुंबाला अश्रु अनावर झाले होते. सदयस्थितित सुरु असलेल्या हंगामात बैलाचे विज पडून ठार झाल्याने आबा माळी यांचे सुमारे पंचेचाळीस हजाराचे नुकसान झाले आहे.

दरम्यान आबा माळी या बळीराजा वर ऐन हंगामात अस्मानी संकट कोसळल्याने शेतातील राहिलेली पुढील काम करणे जिकिरीचे जाणार आहे.

 


Protected Content

Play sound