जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर येथे दिलेल्या बहीणीच्या भेटीला आलेल्या भावाचा रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यु झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
भरत राजेंद्र अहिरे (वय-३२,रा. नगरदेवळा) असे मयताचे नाव असून त्यांचे मेहुणे ललीत ठाकरे यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
सविस्तर माहिती अशी की, भरत अहिरे हा नगरदेवळा येथील रहिवाशी आहे. शहरातील शिवाजी नगरात राहणाऱ्या बहिणीकडे भेटायला आला होता. दरम्यान सकाळी ८ वाजेपुर्वी भरतचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे उघडकीला आले. ट्रॉलीमन फारुख यांनी उपस्टेशन प्रबंधक आर.के. पालरेचा यांना माहिती दिल्यावर त्यांनी शनिपेठ पोलिसांना माहिती कळवली. त्यानंतर पोलिस नाईक गणेश गव्हाळे, मुकूंद गंगावणे, अशांनी धाव घेत मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. मृतदेहाची ओळख पटवण्यात आल्यानंतर मयत व्यक्ती भरत राजेंद्र अहिरे हे नगरदेवळा येथील रहिवासी असून सलून व्यवसायीक होते. त्यांच्या पश्चात आई भाऊ वहीनी असा परिवार आहे. शनिपेठ पेालिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गणेश गव्हाळे करत आहेत.