Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात धडकणार निळे वादळ : ७ नोव्हेंबरला आंबेडकरांची सभा !

मुक्ताईनगरात धडकणार निळे वादळ : ७ नोव्हेंबरला आंबेडकरांची सभा !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अभियंता संजय पंडित ब्राह्मणे यांच्या प्रचारासाठी ७ नोव्हेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने अभियंता संजय ब्राह्मणे यांच्या रूपाने प्रबळ उमेदवार दिला आहे. त्यांनी मतदारसंघातून झंझावाती प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, त्यांच्या प्रचारासाठी गुरूवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी युवा नेते सुजात बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दुपारी एक वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भव्य प्रांगणावर सुजात आंबेडकर यांची सभा होणार आहे. यात संविधानवादी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अभियंता संजय ब्राह्मणे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound