Home राजकीय नाशिकमध्ये महायुतीला धक्का; छगन भुजबळांचे पुतणे अपक्ष लढणार

नाशिकमध्ये महायुतीला धक्का; छगन भुजबळांचे पुतणे अपक्ष लढणार


नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महायुतीला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादीचा राजीनामा देत नांदगाव मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी या जागेसाठी पक्षाकडे मागणी सुद्धा केली होती. परंतू ही जागा शिंदे गटाला सुटल्याने ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे.

नांदगावमध्ये सध्या विद्यमान आमदार सुहास कांदे आहे. या मतदारसंघात भुजबळ कुटुंबाची मोठी ताकद असून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ येथे दोन टर्मचे आमदार राहिलेले आहे. कांदे आणि भुजबळ कुटुंबामध्ये तीव्र राजकीय मतभेद आहेत. समीर भुजबळांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली व अपक्ष लढण्याची घोषणा केली.


Protected Content

Play sound