Home क्राईम अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू !

अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृतयू झाल्याची घटना शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता घडली होती. याबाबत शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रतन वसंत गायकवाड वय ५१ रा. दापोरा ता. जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रतन गायकवाड हे सोमवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास वावडदा रोडने दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सकाळी ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


Protected Content

Play sound