मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभर चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हफ्ते देखील जमा झाले आहे. महिलांना रक्षाबंधनाच्या आधीच 3 हजार रुपये जमा झाले आहेत. महिलांसाठीच्या या योजनेते देखील घोटाळ्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे.
एक व्यक्तीने पत्नीच्या नावे लाडकी बहीण योजनेचे तब्बल 30 अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा येथील एका पठ्ठ्याने चक्क 30 अर्ज दाखल करत शासनाचे हजारो रूपये लाटले आहेत. खारघरमधील महिला पूजा प्रसाद महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर झाल्याचे समोर आल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयात तक्रार केली असता हा प्रकार समोर आला आहे.
पूजा महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पूजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाले असल्याचे समोर आले.
मात्र त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरल्याचे आढळले. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.